Sushma Andhare : ‘अंगावर महागडी साडी, टांझानियाची टिकली अन् नायझेरियाची लिपस्टिक, महिला आयोगात शो पीस….’, अंधारेंचा घणाघात

| Updated on: Nov 14, 2024 | 12:17 PM

ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर टीका केली आहे. महिला आयोगात शो पीस बाहुल्या आहेत, असं म्हणत सुषमा अंधारे यांनी चाकणकरांवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला आहे.

महिला आयोगात शो पीस बाहुल्या आहेत, असं म्हणत ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. पाचारो येथे महाविकास आघाडीच्या सौ. वैशालीताई नरेंद्र सिंग सुर्यवंशी यांच्या प्रचारार्थ घेतलेल्या सभेत सुषमा अंधारे यांनी रूपाली चाकणकर यांच्यावर सडकून टीका केल्याचे पाहायला मिळाले. ‘महिला आयोगात शो पीस बाहुल्या आहेत. शो पीस बाहुल्या म्हणून काम करणाऱ्या, सोयिस्करवादाच्या धनी असलेल्या यांच्या महिला कार्यकर्त्या. महिलांच्या प्रश्नांवर काही बोलत नाहीत. चकार शब्द काढत नाहीत. नुसतं टुकू टुकू… अशानं प्रश्न सुटत नाहीत. उगाच अंगावर महागडी साडी नेसून स्वदेशी अंबाड्यात मेड इन अमेरिकाच्या प्लॅस्टिक फुलांचा गजरा माळून, केसात इंग्लंडचं बक्कल, टांझानियाची टिकली अन् नायझेरियाची लिपस्टिक चिकटवून, ब्राझीलवरून आणलेल्या उंच- उंच चपला पायात घालून महिला मुक्तीवर बोलतात’, असं म्हणत सुषमा अंधारे यांनी चाकणकरांवर टीका केली आहे.

Published on: Nov 14, 2024 12:17 PM
Pankaja Munde : पंकजा मुंडेंचं घड्याळ चिन्हावर वादग्रस्त वक्तव्य; म्हणाल्या, ‘आयुष्यात कधी घड्याळ्याला मतदान…’
Ajit Pawar : पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार की नाही? अजित पवारांचं मोठं वक्तव्य