एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून भाजपनं मुंबई लुटली? ठाकरे गटाच्या नेत्याचा घणाघात
मुंबई लुटण्याचं काम भाजपनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून केले असल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी केला आहे. मुंबई महापालिकेच्या ९२ हजार कोटी रूपयांच्या ठेवींमधून १२ हजार कोटींच्या ठेवी खर्च केल्याचेही विनायक राऊत यांनी म्हटले.
रत्नागिरी, २५ डिसेंबर २०२३ : मुंबई लुटण्याचं काम भाजपनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून केले असल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी केला आहे. मुंबई महापालिकेच्या ९२ हजार कोटी रूपयांच्या ठेवींमधून १२ हजार कोटींच्या ठेवी खर्च केल्याचेही विनायक राऊत यांनी म्हटले. तर मुंबई आणि ठाण्याची अवस्था पाहिली तर एकनाथ शिंदे यांना बोलण्याचं धाडस देखील होणार नाही. केवळ मुंबई लुटण्याचं काम एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाने केलं असल्याचा हल्लाबोलही विनायक राऊत यांनी केलाय. पुढे ते असेही म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी चोरांचा महामेरू असा भाजपचा केलेला उल्लेख योग्य आहे. खाल्ल्या ताटात घाण करणारी शिंदे आणि अजित पवार गटाची औलाद आहे, अशी जिव्हारी लागणारी टीकाही त्यांनी केली.
Published on: Dec 25, 2023 02:24 PM