कर्नाटक सरकारने घेतलेल्या ‘त्या’ निर्णयावर ठाकरे गटातून पहिली प्रतिक्रिया

| Updated on: Jun 16, 2023 | 5:25 PM

VIDEO | वीर सावरकर अन् हेडगेवार यांचे धडे कर्नाटक वगळल्यानंतर उद्धव ठाकरे गटातून पहिली प्रतिक्रिया, काय केलं भाष्य....

मुंबई : कर्नाटकच्या मंत्रिमंडळाने या शैक्षणिक वर्षासाठी कर्नाटक राज्यातील इयत्ता ६ वी ते १० वीच्या कन्नड आणि सामाजिक विज्ञान पाठ्यपुस्तकांमध्ये स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक प. पू. डॉ. हेडगेवार यांच्यावरील प्रकरणे काढण्यास मंजुरी दिली. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा धडा अभ्यासक्रमातून वगळण्याचा निर्णय कर्नाटक सरकार घेतल्यानंतर त्याची चर्चा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात होत आहे. यावर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत असताना ठाकरे गटाकडून पहिली प्रतिक्रिया येत आली आहे. अशातच स्वातंत्र्यवीर सावरकर आमचे प्रेरणास्थान असल्याचे ठाकरे गटाच्या प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी सांगितले. याशिवाय कर्नाटक सरकारने घेतलेल्या निर्णयाचा आम्ही निषेध करतो असेही त्या म्हणाल्या

Published on: Jun 16, 2023 05:22 PM
भाजप नेत्याच्याच ऑफर बावनकुळेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “उद्धव ठाकरेंसाठी भाजपची दारं बंद!”
मोठी बातमी! शरद पवार धमकी प्रकरणातील सौरभ पिंपळकर माध्यमांसमोर…