’50 खोके एकदम ओक्के’ भाषणाच्या सुरुवातीलाच हल्लाबोल, मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर आदित्य ठाकरे बरसले

| Updated on: Feb 26, 2023 | 10:53 PM

ठाकरे गटाचे युवासेना नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटावर जोरदार साधला निशाणा

मुंबई : शिवसेना म्हणजे मुंबई आणि मुंबई म्हणजे शिवसेना असे म्हणत ठाकरे गटाचे युवासेना नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला. वरळीतील शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यात बोलताना आदित्य ठाकरे यांनी विविध मुद्यांवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्यापासून ते भाजपवर चांगलाच हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी माध्यमांच्या कॅमेऱ्यांना सांगितले तुम्ही गद्दारांच्या रिकाम्या खुर्च्या दाखवण्यापेक्षा या कट्टर शिवसैनिकांची गर्दी दाखवा, असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी टोला लगावला. आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टीका करताना हे खोकेवाल्यांचे सरकार असल्याचे म्हणत आज पुन्हा एकदा त्यांनी गद्दार म्हणत एकनाथ शिंदे गटातील नेत्यांवर टीका केली. 50 खोके एकदम ओक्के भाषणाच्या सुरुवातीलाच आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर चढवला हल्लाबोल.

Published on: Feb 26, 2023 10:53 PM
अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी शिवसेनेत नवी खेळी, ठाकरे गटाच्या आमदारांना आणले अडचणीत
सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांसाठी मोठी बातमी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली घोषणा