गद्दारांना थोडी जरी लाज असेल तर…, आदित्य ठाकरे यांनी हल्लाबोल करत दिलं आव्हान

| Updated on: Apr 11, 2023 | 8:03 PM

VIDEO | भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी बाबरीबाबत केलेल्या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात खळबळ, आदित्य ठाकरे म्हणाले...

मुंबई : भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी बाबरीबाबत केलेल्या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी उद्धव ठाकरे यांनी चंद्रकांत पाटील यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. चंद्रकांत पाटील यांनी बाबरी मशिद पाडण्याच्या मुद्द्यावरून केलेल्या व्यक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. अशातच ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर आणि सरकारवर निशाणा साधला आहे. आदित्य ठाकरे म्हणाले, हे सगळे बेताल वक्तव्य करत आहे. परंतु त्यांचं जे खातं आहे त्या खत्यातील टीवायबीएची उदयापासून परीक्षा सुरू होत आहे मात्र अजून विद्यार्थ्यांना हॉल तिकीट मिळालेलं नाही. तर पाचव्या सेमिस्टरची परीक्षा होऊन गेली तरी निकाल अद्याप आला नाही, गद्दारांमध्ये थोडी तरी लाज असेल तर त्यांच्या राजीनामा घेतला पाहिजे. नाही तर सरकारमधून बाहेर पडलं पाहिजे, असे म्हणत त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली आहे.

Published on: Apr 11, 2023 08:03 PM
‘घरात बसून काम न केलेला एकमेव नेता’, भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांच्यावर थेट निशाणा
‘मविआ’तील सर्वात मोठी घडामोड, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात होणार भेट