‘ठाकरे म्हणजे धनुष्यबाण आणि…’, शिवगर्जना अभिनायनांतर्गत ठाकरे गटाच्या नेत्याची शिंदे गटावर सडकून टीका
VIDEO | ठाकरे गटाच्या 'या' नेत्याचं मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात जोरदार भाषण, शिवगर्जना अभिनायनांतर्गत बघा काय केली शिंदे गटावर जोरदार टीका
ठाणे : ठाकरे गटाचे नेते भास्करराव जाधव यांनी शिवसेना ही उद्धव ठाकरे गटाचीच कशी आहे, हे समजावून सांगताना ठाकरे म्हणजे मातोश्री, ठाकरे म्हणजे धनुष्यबाण आणि ठाकरे म्हणजेच शिवसेना असे म्हणत शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला आहे. ज्या दिवशी एकनाथ शिंदे यांना शिवसेना पक्ष आणि चिन्ह गेलं त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी देवऱ्हात असलेला धनुष्यबाण आणून जनतेला दाखवला. त्यावेळी उद्धव ठाकरे यांना काय यातना झाल्या असतील याचा विचार करा असं भास्करराव जाधव म्हणत ते भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. ज्या दिवशी शिवसेनेच चिन्ह आणि पक्ष एकनाथ शिंदे यांच्याकडे गेला तो दिवस खरं तर देशात अघटीत घटना घडल्यासारखी आहे. 18 तारखेला शिवसेना मूळ पक्षाचे नाव आणि चिन्ह हे गद्दारांना देण्यात आले.या देशाच्या 75 वर्षाच्या इतिहासात अशी घटना पहिल्यांदा घडली आहे. यावेळीही त्यांनी शिवसेना म्हणजे ठाकरे, धनुष्यबाण म्हणजे ठाकरे असंही शिंदे यांना ठणकावून सांगितले.