एसीबीच्या धाडीवर राजन साळवी थेट म्हणाले; चौकशी करा, धाडी टाका पण मी…

| Updated on: Jan 18, 2024 | 2:20 PM

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते, आमदार राजन साळवी यांच्या घरावर आज एसीबीने धाड, १० ते १२ एसीबीच्या अधिकाऱ्यांकडून त्यांची चौकशी सुरू आहे. या कारवाईवर भाष्य करताना राजन साळवी यांनी काय म्हटलं?

रत्नागिरी, १८ जानेवारी २०२४ : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते, आमदार राजन साळवी यांच्या घरावर आज एसीबीने धाड टाकली. १० ते १२ एसीबीच्या अधिकाऱ्यांकडून त्यांची चौकशी सुरू आहे. या कारवाईवर भाष्य करताना ते म्हणाले, माझी मानसिकता होतीच. रत्नागिरी जिल्ह्यातील लोक माझे आहेत. ते मला सांगत होते. कालच मला फोन येत होते. ही लोकं आलेली आहेत. रत्नागिरीतील अल्पा हॉटेलला थांबली आहेत. ती लोकं घरी येणार आहेत. याची मला माहिती होती. मला ज्या लोकांचा माझ्यावर विश्वास आहे त्यांच्याकडून ही माहिती मिळते. गुन्हा दाखल झाला तरी चौकशीला सामोरे जायला तयार आहे, असे राजन साळवी यांनी म्हटले आहे. तर याकारवाई मागचं कारण सांगतांना राजन साळवी असेही म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्या गटातील निष्ठावंत कार्यकर्ता आहे. त्यामुळे मला त्रास देण्याचा प्रयत्न पण मी या कोणत्याही चौकशीला घाबरत नाही. माझी चौकशी करा. घरावर धाडी टाका. मला अटक करा. पण मी उद्धव साहेबांना सोडणार नाही, असे साळवी यांनी म्हटलेय.

Published on: Jan 18, 2024 02:17 PM
उद्धव ठाकरे यांच्या महापत्रकार परिषदेनंतर सोशल मीडियावर तुफान चर्चा, लोकांचे तर्क-वितर्क काय?
Maratha Reseration : ‘त्या’ मराठ्यांना कुणबी सर्टिफिकेट मिळणार? राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना काय दिले आदेश?