झुकेगा नही! माझी चौकशी सुरु असली तरी… राजन साळवी ACB च्या कारवाईवर नेमकं काय म्हणाले?

| Updated on: Feb 05, 2024 | 3:38 PM

उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राजापूर या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तसेच ठिकठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली आहे. झुकेगा नही अशा आशयाचे बॅनर लावण्यात आलेले आहेत. दरम्यान, ठाकरे गटाते नेते आमदार राजन साळवी यांनी देखील यावर भाष्य केले आहे.

रत्नागिरी, ५ फेब्रुवारी २०२४ : उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याचा आजचा शेवटचा दिवस आज राजापूर लांजा येथून उद्धव ठाकरे यांच्या जनसंवाद मेळाव्याला सुरूवात होत आहे. उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राजापूर या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तसेच ठिकठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली आहे. झुकेगा नही अशा आशयाचे बॅनर लावण्यात आलेले आहेत. दरम्यान, ठाकरे गटाते नेते आमदार राजन साळवी यांनी देखील यावर भाष्य केले आहे. तर या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण आहे शिवसैनिकांसाठी आज पर्वणी असून उद्धव ठाकरे यांचं भव्य स्वागत करण्यात येईल. यावेळी राजन साळवी यांनी त्यांच्यावर झालेल्या एसीबी कारवाईवरही प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, माझी चौकशी सुरु असली तरी मी झुकणार नाही त्यांना चौकशी करायची ती करुद्या आम्ही तयार आहोत. आव्हानं येत असताना त्यांना आम्ही पार करू, असेही त्यांनी म्हटले.

Published on: Feb 05, 2024 03:37 PM
मंत्रिपदाचा राजीनामा का दिला? मंत्री छगन भुजबळ यांनी पुन्हा स्पष्टपणे सांगितलं कारण
संजय राऊत यांनी केली किरीट सोमय्यांची नक्कल अन् काय दिलं थेट आव्हान?