बेताल वक्तव्य करून कर्मचाऱ्यांना डिवचणं चुकीचं, संजय गायकवाड यांच्यावर कुणाचा निशाणा
VIDEO | सरकारी कर्मचारी यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, संजय गायकवाड यांच्यावर ठाकरे गटातील नेत्याचा निशाणा
मुंबई : काही लोक बेताल वक्तव्य करत आहेत, असे वक्तव्य ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनी करत शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. कर्मचाऱ्यांचा मागण्या योग्य आहे की अयोग्य हा मुद्दा वेगळा आहे. मात्र बेताल वक्तव्य करत सरकारी कर्मचाऱ्यांना डिवचणं हे चुकीचं असल्याचे म्हणत सचिन अहिर यांनी संजय गायकवाड यांच्यावर टीका केली आहे. ‘काही लोकं बेताल वक्तव्य करत सुटलेली आहेत. एका बाजूला शेतकरी आत्महत्या करत असताना कृषीमंत्रीा अब्दुल सत्तार वेगळं विधान करताय. तर आता सरकारी कर्मचाऱ्यांची ९५ टक्के कमाई ही हरामाची असल्याचे वक्तव्य संजय गायकवाड यांच्याकडून करण्यात आलं आहे. राज्यात हे चाललंय तरी काय?’, असा प्रश्न देखील सचिन अहिर यांनी उपस्थित केला आहे. तर सरकारी कर्मचारी कोणती मागणी घेऊन रस्त्यावर उतरत असेल आणि त्यांच्यावर असं बेताल वक्तव्य करून डिवचणं अयोग्य आहे, असे देखील सचिन अहिर यांनी म्हटले आहे.