‘चिपी विमानतळ बंद करण्याचा भाजपचा घाट’, कुणी केला हल्लाबोल?

| Updated on: May 31, 2023 | 8:21 AM

VIDEO | ...तर चिपी विमानतळ बंद पडणार, विमानतळावरून अनियमित विमानसेवा सुरू, कुणी दिला इशारा?

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले मधील चिपी विमानतळावरून आता अनियमित विमानसेवा सुरू आहे. एक दिवसाआड मुंबई ते चिपी आणि चिपी ते मुंबई विमानसेवा सुरू आहे. याकडे कोणत्याही राजकिय पक्षाचा लक्ष नाही. येत्या काळात ही विमानसेवा बंद होईल की काय अशी भीती स्थानिकांना आहे. पर्यटन वाढीसाठी हे विमानतळ एक महत्त्वाचा दुवा ठरेल असं म्हटल जायचं मात्र आता अनियमित विमानसेवा असल्याने याकडे राजकीय नेत्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. राज्यातलं आणि केंद्रातलं भाजप सरकार गोव्यात मोपा विमानतळ झाल्यामुळे सिंधुदुर्गातील चीपी विमानतळ बंद करण्याचा घाट घालत आहेत. राज्यात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना अनेक अडचणी असताना देखील सिंधुदुर्गातील चीपी विमानतळ सुरू केलं. मात्र जवळच मोपा विमानतळ सुरू झाल्याने हे विमानतळ बंद करण्याचा घाट भाजप सरकार करत असल्याचा आरोप ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी केला आहे. कधीही विमान रद्द होणे, अनियमित विमानसेवा कडे कुठल्याही मंत्र्यांनी आणि अधिकाऱ्यांनी लक्ष दिलं नाही त्यामुळेच अनियमित विमानसेवा चीपी विमानतळावरून सुरू आहे. अशीच परिस्थिती राहिली तर हे विमानतळ बंद पडण्याची दाट शक्यता आहे.

Published on: May 31, 2023 08:21 AM
गौतमी पाटील हिने मानले पाठिंबा देणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांचे आभार, म्हणाली…
‘… तू होते का माझी परी?’, गौतमी पाटील हिला पत्र लिहून पठ्ठ्यानं केली थेट लग्नाची मागणी