‘गृहमंत्र्यांच्या आशीर्वादानं जालन्यात झालेल्या हल्ल्याचा निषेध’, ठाकरे गटाचे आमदाराचा हल्लाबोल
VIDEO | 'भाजप नेते आणि आमदार नितेश यांनी मराठा बांधव म्हणून गृहमंत्र्यांचा निषेध करत मोर्च्यात सहभागी व्हावं', ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांची आक्रमक मागणी
सिंधुदुर्ग, २ सप्टेंबर २०२३ | जालना येथील आंदोलकांवर जो लाठीचार्ज झाला तो शिंदे फडणवीस सरकारने गृहमंत्र्यांच्या आशीर्वादाने केलाय असा आरोप करत ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी या घटनेचा निषेध केलाय. तर जालना येथील मराठा बांधवांना पाठिंबा देण्यासाठी आणि राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी सोमवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मराठा बांधव मोर्चा काढणार आहे, असे आमदार वैभव नाईक यांनी सांगितले. तर आमदार नितेश राणे यांनी जालना येथे झालेल्या हल्ल्याबाबत आरोप करण्यापेक्षा जो लाठीचार्ज झाला त्याचां आणि गृहमंत्र्यांच्या निषेध करावा. ज्यांनी दगडफेक केली त्याची चौकशी आपल्याजवळ असलेल्या यंत्रणांच्या माध्यमातून करावी. आणि मराठा समाजाचे नेते म्हणून त्यांनी सोमवारच्या मोर्चात आमच्या सोबत सहभागी व्हावे. असा उपरोधिक सल्ला आमदार वैभव नाईक यांनी आमदार नितेश राणे यांना दिलाय. आमदार नितेश राणे यांनी जालना येथे करण्यात आलेल्या दगडफेकीत अंबादास दानवे यांचा निकटवर्तीय असल्याचा आरोप केलाय त्यावर बोलताना नाईक यांनी हा सल्ला दिलाय.