राहुल गांधींच्या खटल्याबाबत तत्परता दाखवली तेवढी जर…, अरविंद सावंत यांनी काय केला मोठा दावा

| Updated on: Mar 24, 2023 | 4:47 PM

VIDEO | राहुल गांधींच्या समर्थनार्थ काँग्रेससोबत ठाकरे गट रस्त्यावर उतरणार का? काय म्हणाले ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत?

नवी दिल्ली : चोरों का नाम मोदी ही क्यों होता है.. या वक्तव्यावरून राहुल गांधी यांच्यावर मानहानीचा खटला दाखल करण्यात आला होता. त्या कोर्टात गुरुवारी राहुल गांधी यांच्यावरील खटल्यासंबंधी सुनावणी होणार होती. मात्र दोन दिवस आधीच सूरत कोर्टातील न्यायाधीश बदलण्यात आले, असा दावा ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी केला. राहुल गांधी यांच्यावरील कारवाईबाबत, त्यांच्या कोर्टातील खटल्याबाबत जेवढी तत्परता दाखवली, तेवढी तत्परता महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष, शिवसेनेच्या खटल्याबाबत का दाखवत नाहीत, असा सवाल अरविंद सावंत यांनी केला आहे. देशभरात घडणाऱ्या घटनांमुळे लोकशाही धोक्यात असून यासाठी एकजुटीने लढा द्यावा लागेल. यासाठी आम्ही काँग्रेससोबत आहोत, असं वक्तव्य खासदार अरविंद सावंत यांनी केलं आहे.

Published on: Mar 24, 2023 04:46 PM
विंटेज रोल्स रॉयल मधून शिवेंद्रराजे यांची भन्नाट राईड
आशा भोसले यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मान; म्हणाल्या 90 वर्षे या दिवसाची वाट पाहिली…