मणिपूरच्या हिंसेवरून अरविंद सावंत आक्रमक, थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना केला ‘हा’ सवाल

| Updated on: Aug 07, 2023 | 1:23 PM

VIDEO | मणिपूरच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांची सडकून टीका, थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनाच केला सवाल

मुंबई, ७ ऑगस्ट २०२३ | मणिपूर येथील हिंसाचार प्रकरणावरून अद्याप देशातील वातावरण शांत झालेलं नाही. अशातच मणिपूर येथील हिंसेवरून ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनाच घेरलं आहे. ते म्हणाले, ‘दोन दिवसांपूर्वी मी मणिपूरला गेलो. तिकडे ओपन फायरिंग सुरू आहे. घरं पेटवत आहेत. महिलांना विवस्त्र फिरवलं जातंय. दुर्दैवानं राष्ट्रपतीही महिला आहेत. राष्ट्रपती रबर स्टँप आहेत हे खरंच आहे. आम्ही भेटलो. त्याही अशाच समाजातल्या आहेत. पण तुम्हाला राग नाही येत, चीड येत नाही का?’, असे सवालही त्यांनी आक्रमक होत केला. काल मुंबईत उद्धव ठाकरे गट आणि संभाजी ब्रिगेडचा संयुक्त मेळावा पार पडला. यावेळी अरविंद सावंत यांनी मणिपूरच्या मुद्द्यावरून राग व्यक्त केला.

Published on: Aug 07, 2023 01:23 PM
दिल्लीतील एम्स रुग्णालयाला भीषण आग; अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल
‘संजय राऊत पिसाळलेला कुत्रा अन् ते चावले म्हणून आम्ही चावणार नाही’, शिंदे गटाच्या आमदाराचा घणाघात