‘… हा बेशरमपणा’, शितल म्हात्रे यांच्या आरोपावर ठाकरे गटाकडून थेट प्रत्युत्तर
VIDEO | जनतेच्या कामाशी आमची बांधिलकी आहे म्हणत शीतल म्हात्रे यांच्या आरोपांना ठाकरे गटाकडून रोखठोक उत्तर, बघा व्हिडीओ
मुंबई : शिवसेना पक्षाच्या नेत्या आणि प्रवक्त्या शितल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे या दोघांचा एक व्हीडिओ मॉर्फ करुन व्हायरल करण्यात आला. याप्रकरणी शितल म्हात्रे यांनी संताप व्यक्त करत पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली. यावेळी त्यांनी ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला. यानंतर आता ठाकरे गटाकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. ‘आमचं नाव घेऊन प्रसिद्धी मिळवणं म्हणजे बेशरमपणा आहे. त्यांना वाटतं की आमच्याकडे काही उद्योग नाही. ज्यांनी स्वत:च नाव बदनाम केलंय. ज्यांनी 50 खोके खाऊन काम करतायेत, आम्ही त्यांच्यासाठी व्हीडिओ बनवणार? असा सवाल ठाकरे गटाचे खासदार प्रियंका चतुर्वेदी उपस्थित केला आहे. आम्हाला स्वत:ची कामं आहेत. आमची कामं जनतेशी संबंधित आहेत. जनतेच्या कामाशी आमची बांधिलकी आहे. तसेच जर असा व्हिडीओ व्हायरल झाला असेल, तर त्यासाठी सायबर सेल आहे. सायबर सेल त्यांची जबाबदारील पार पाडेल. पण आरोप करणं, राजकारण करणं, तसेच प्रसिद्धीसाठी दुसऱ्यांवर आरोप करणं हा बेशरमपणा आहे.’ असे म्हणत प्रियंका चतुर्वेदी यांनी जोरदार टीकाही केली.