एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्री पद जाणार? १३ मे नंतर काय ? संजय राऊत यांनी केलं पुन्हा नवं भाकित
VIDEO | १३ मे नंतर मोठी घडामोड, राज्याबरोबर देशाच्या पातळीवर उलथापालथ होणार, संजय राऊत यांनी काय केलं भाकित? बघा स्पेशल रिपोर्ट
मुंबई : राजकीय वर्तुळात शिंदे-फडणवीस सरकार लवकरच पडणार असा अनेकदा दावा करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. अशातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे पुन्हा पुन्हा सरकार कोसळण्याचे भाकित करताना दिसताय. आता संजय राऊत यांनी १३ मे नंतर मोठ्या घडामोडी घडल्याचे भाकित केले आहे. १३ मे नंतर मोठ्या घडामोडी घडणार असं संजय राऊत यांनी भाकित केलं असून या घडामोडी राज्याबरोबर देशाच्या पातळीवर घडणार असल्याचेही म्हटलं आहे. त्यामुळे १३ मे नंतर नेमकं काय होणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे. १३ मे रोजी कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल, महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकालही अपेक्षित आहे. तर घटनापीठातील न्यायमूर्ती एम आर शाह १५ मे रोजी निवृत्त होतायत. २० मे पासून सुप्रीम कोर्टाची उन्हाळी सुट्टी सुरू होतेय. त्यामुळे न्या शाहांच्या निवृत्तीच्या एक दिवसआधी म्हणजे १४ मे रोजीही निकाल लागू शकतो. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर केवळ राज्याचं लक्ष नाहीये तर संपूर्ण देशाचं लक्ष आहे. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट…