‘पक्ष सोडा नाहीतर…’, ठाकरे गटाच्या आमदाराला धमक्या, राऊत यांच्या ‘त्या’ ट्वीटनं खळबळ

| Updated on: Feb 08, 2024 | 5:50 PM

संजय राऊत यांनी ट्वीटरवरून यासंदर्भातील खळबळजनक दावा केला आहे. रवींद्र वायकर यांच्यामागे सध्या ईडी चौकशीचा ससेमिरा सुरू आहे. अशातच संजय राऊत यांनी एक ट्वीट करून एकच खळबळ उडून दिली आहे. शिवसेनेतील आमचे सहकारी नेते आमदार रवींद्र वायकर यांच्यावर गेल्या काही दिवसापासून ED वैगरे तपास....

मुंबई, ८ फेब्रुवारी २०२४ : उद्धव ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांना ईडीच्या धमक्या दिल्या जात असल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. दरम्यान, संजय राऊत यांनी ट्वीटरवरून यासंदर्भातील खळबळजनक दावा केला आहे. रवींद्र वायकर यांच्यामागे सध्या ईडी चौकशीचा ससेमिरा सुरू आहे. अशातच संजय राऊत यांनी एक ट्वीट करून एकच खळबळ उडून दिली आहे. ‘शिवसेनेतील आमचे सहकारी नेते आमदार रवींद्र वायकर यांच्यावर गेल्या काही दिवसापासून ED वैगरे तपास यंत्रणांच्या माध्यमातून प्रचंड दबाव सुरू आहे. येत्या काही दिवसात शिवसेना सोडा. पक्षांतर करा. नाहीतर तुरुंगात जा असे त्यांना धमकावले जात आहे. हा एक प्रकारे दहशतवाद आहे. असे राजकारण या आधी कधीच घडले नव्हते. रवींद्र वायकर हे निष्ठावंत शिवसैनिक असून ते कोणत्याही धमक्या आणि दबावाला भीक घालणार नाहीत..ते लढतील व जिंकतील.आम्ही सर्व त्यांच्या सोबत आहोत’, असे ट्वीटद्वारे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Published on: Feb 08, 2024 05:50 PM
अजमेर जाकर मेरे लिये…; मुस्लिम बांधवांना प्रणिती शिंदे यांनी काय घातली भावनिक साद?
राष्ट्रवादी शरद पवार यांच्या हातून निसटली, दिल्लीच्या पक्ष कार्यालयावरील घड्याळ चिन्हाचा ध्वज उतरवला