‘तो’ चोरीचा माल भाजपने चोरला, संजय राऊतांचा घणाघात काय?

| Updated on: Apr 05, 2024 | 12:39 PM

किमान ४० वर्ष धनुष्यबाण महाराष्ट्राच्या जीवनाचा अविभाज्य भाग होता. पण ज्यांनी हा धनुष्यबाण घेतला त्यांना हा धनुष्यबाण वाचविता आला नाही कारण ते खोटे आहेत. त्यांनी धनुष्यबाण चोरला त्यांनी शिवसेना चोरली आणि तो चोरीचा माल भाजपने चोरला, असा खोचक टोला राऊतांनी लगावला

अमित शाह आणि नरेंद्र मोदींनी अघोरी जादू केली. ज्या धनुष्यबाणावर बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्राची श्रद्धा होती तो धनुष्यबाण महाराष्ट्रातून गायब करण्याचे आघोरी कृत्य या दोघांच्या भाजपने केल्याचे विधान संजय राऊत यांनी केलं. किमान ४० वर्ष धनुष्यबाण महाराष्ट्राच्या जीवनाचा अविभाज्य भाग होता. पण ज्यांनी हा धनुष्यबाण घेतला त्यांना हा धनुष्यबाण वाचविता आला नाही कारण ते खोटे आहेत. त्यांनी धनुष्यबाण चोरला त्यांनी शिवसेना चोरली आणि तो चोरीचा माल भाजपने चोरला, असा खोचक टोला त्यांनी लगावला. शिवसेना आणि धनुष्यबाण महाराष्ट्रातून नष्ट करायचा हे त्यांचा स्वप्न होतं आणि त्याला हे 40 खोकेवाले बळी पडले. कामाख्या देवीच्या पायापाशीचे रेडे कापले तिथे हीच प्रार्थना केली का? आमचा धनुष्यबाण जाऊ द्या? तुम्हाला इतिहास माफ करणार नाही, असे म्हणत राऊतांनी शिंदे गट आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.

Published on: Apr 05, 2024 12:35 PM
आधी भाजपचा प्रचार अन् वंचितकडून मिळालं लोकसभेचं तिकीट, उमेदवारीवरून रंगलंय घमासान
तर नारायण राणे तिहार जेलमध्ये जातील, संजय राऊत यांचा इशारा काय?