शिंदेंच्या टोळीनं 48 जागा लढल्या तरी…, संजय राऊत यांनी शिंदे गटावर काय केला दावा?
VIDEO | खुराड्यातील कोंबड्यांच्या मानेवर कधीही सुरू फिरवली जाईल, संजय राऊत यांचा शिंदेंच्या शिवसेनेवर हल्लाबोल
मुंबई : शिवसेना शिंदे गटाची एक बैठक झाली यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेनेकडून लोकसभेच्या २२ जागांवर दावा करणार असल्याचे सांगितले जात आहे. ठाकरे गटानं लढलेल्या २३ पैकी २२ जागांवर शिंदे गटाची तयारी सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. इतकंच नाही तर लोकसभेसाठी शिंदे गटाचं मिशन २२ तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लोकसभा निवडणुकीकरता २२ जागांवर आग्रही असल्याचेही सुत्रांकडून माहिती मिळतेय. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी संजय राऊत म्हणाले, मिंधे टोळीने २२ काय ४८ जागा लढवाव्यात आम्हाला काही फरक पडत नाही. २२ काय शिंदे गटाला पाच जागाही मिळणार नाही, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. मागच्या लोकसभेत आमचे १९ खासदार होते. महाराष्ट्रात १८ होते. आमचा १९ खासदारांचा आकडा कायम राहील. माझ्या वक्तव्यावर कोणी टीका केली तरी मला फरक पडत नाही. मी पक्षाची भूमिका मांडत आहे. १९ जागा कायम राहतील, असंही ते म्हणाले. तर मी शिंदे गटाकडे पक्ष म्हणून पाहत नाही. भाजपने पाळलेलं ते कोंबड्याचं खुराडं आहे. गावात खुराडं असतं, तसं हे खुराडं आहे. या खुराड्यातील कोंबड्यांच्या मानेवरून कधीही सुरी फिरवली जाईल आणि त्या कधीही कापल्या जातील. सकाळ, संध्याकाळ कोंबड्या आरवत असतता. तसे ते आहेत. कॉक कॉक कॉक करत आहेत. तसे करत आहेत. त्यांना काय पक्ष म्हणायचं का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.