Sanjay Raut : शिंदे सरकारमधील लोकांना दिवाळीपूर्वी दंगली घडवायच्यात का? संजय राऊत यांचा घणाघात
VIDEO | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांचा शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र डागलं. सरकारच्या पक्षात आणि मंत्रिमंडळात असे लोक आहेत जे मराठा आरक्षणावरून वातावरण खराब करत आहेत. महाराष्ट्रात दिवाळीपूर्वी दंगली घडवायच्या आहेत का? राऊतांचा सवाल
मुंबई, २३ ऑक्टोबर २०२३ | ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मराठा आरक्षणावरून शिंदे-फडणवीस सरकारवर सडकून टीका केली आहे. सरकारच्या पक्षात आणि मंत्रिमंडळात असे लोक आहेत जे मराठा आरक्षणावरून वातावरण खराब करत आहेत. महाराष्ट्रात दिवाळीपूर्वी दंगली घडवायच्या आहेत का? असा सवाल करत संजय राऊत यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केलाय. पुढे संजय राऊत असेही म्हणाले की, मराठा आरक्षणाबाबतीत छगन भुजबळ यांचं मत वेगळं आहे. जे स्वतःला मराठा समजतात असे शिंदे गटातील काही नेते आहेत, ते मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात आक्रमक वक्तव्य करताय आणि म्हणाता, आम्ही कुणबी जातीचं प्रमाणपत्र नाही घेणार आम्ही मराठा आहोत. अशा काही वक्तव्यांमुळे राज्यात मोठी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे, असे राऊत म्हणाले. तर दुर्बल मराठा समाजासाठी मनोज जरांगे पाटील लढा देत आहेत. हा लढा गरीब मराठ्यांचा आहे. यामुळे सरकारने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहावे, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.