Special Report | गद्दार, खोक्यांनंतर राजकारणात नशील्या शब्दांची एन्ट्री! संजय राऊत अन् देवेंद्र फडणवीस यांच्यात शाब्दिक वॉर
VIDEO | ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या बोलण्यावर सत्ताधाऱ्यांना आक्षेप? पण का? बघा स्पेशल रिपोर्ट
मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या सकाळच्या पत्रकार पत्रकार परिषदेवर सत्ताधाऱ्यांनी राग व्यक्त केला तर संजय राऊत सकाळी नशा करून बोलतात अशी टीकाही सत्ताधाऱ्यांनी केली. या टीकेला संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. गद्दार, खोके, बोके,मेंटल आणि सर्किट या शब्दांनंतर राजकारणात काही नशील्या शब्दांनी एन्ट्री केली. नशा, भांग आणि गांजा… उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल अहमदनगरच्या कुस्ती स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात सहभागी झाले होते. यावेळी बोलत असताना त्यांनी नाव न घेत संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला होता. स्वतः बोलत असल्याचा एक व्हिडीओ देखील त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला. ते म्हणाले, ‘सध्याच्या काळात राजकारणातही कुस्त्या सुरू झाल्या आहेत. त्यातील काही जणं सकाळी सकाळी नशा करून कुस्ती खेळतात. पण नशा केलेल्या पैलवानांना कुस्तीतून बादच व्हावं लागतं. जे असली मातीचे पैलवान असतात तेच कुस्त्या जिंकतात. जनतेच्या आशीर्वादानं शिंदेच्या नेतृत्वात आम्ही कुस्ती जिंकली आहे. आणि २०२४ साली पुन्हा भाजप-शिवसेनेचं सरकार येणार’, असे म्हणत त्यांनी विश्वास व्यक्त करत राऊतांना जोरदार टोला लगावला. यावर राऊत काय म्हणाले बघा स्पेशल रिपोर्ट