…तर अयोध्येतील राम तुम्हाला पावणार नाही, संजय राऊत यांचा रोख कुणावर? काय केली टीका?

| Updated on: Dec 20, 2023 | 2:33 PM

देशातील हुकूमशाही आणि लोकशाहीची हत्या सुरू आहे त्याविरोधात आम्ही लढणार आहोत. गुडघे टेकायला आम्ही मिंधे नाहीत, असे भाष्य करत संजय राऊत यांनी सडकून टीका केली आहे. तर लोकशाहीच्या मंदिराचं स्मशान करायचं आणि अयोध्येत राम मंदिराचं उद्धाटन करायचं हे ढोंग आमच्याकडे नाही.

नवी दिल्ली, २० डिसेंबर २०२३ : 141 खासदारांचं निलंबन हे सरकारच्या बेशरमपणाचं लक्षण आहे. निदान प्रधानमंत्र्यांनी खोटं बोलू नये. नरेंद्र मोदी आणि अंधभक्तांनी लोकशाहीच्या मंदिराचे स्मशान केलं आहे. तुम्ही जरी आग लावली तरी देशाची जनता सती जाणार नाही, असे म्हणत संजय राऊत यांनी विरोधकांवर हल्लाबोल केलाय. देशातील हुकूमशाही आणि लोकशाहीची हत्या सुरू आहे त्याविरोधात आम्ही लढणार आहोत. गुडघे टेकायला आम्ही मिंधे नाहीत, असे भाष्य करत संजय राऊत यांनी सडकून टीका केली आहे. तर लोकशाहीच्या रक्षणाची जबाबदारी आमच्याही खांद्यावर आहे. लोकशाहीचं मंदिर मोडून काढायचं आणि राम मंदिराचं उद्धाटन करायचं… लोकशाहीच्या मंदिराचं स्मशान करायचं आणि अयोध्येत राम मंदिराचं उद्धाटन करायचं हे ढोंग आमच्याकडे नाही. राम मंदिर आणि दिल्लीतलं लोकशाहीचं मंदिर संसद यांची प्रतिष्ठा राहायला पाहिजे. जर दिल्लीतील सर्वोच्च लोकशाही मंदिराचं स्मशान करून तुम्ही राम मंदिरात जाऊन नौटंकी करणार असाल तर तो राम तुम्हाला पावणार नाही, असे म्हणत संजय राऊत यांनी भाजपला खोचक टोला लगावला आहे.

Published on: Dec 20, 2023 02:33 PM
Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांचा पुन्हा चार दिवसीय संवाद दौरा, कुठं दिसणार मराठ्यांचा एल्गार?
लोकशाही वाचवा म्हणत संसद भवनाबाहेर गांधी पुतळ्याजवळ निलंबित खासदार आक्रमक, कोणा-कोणाचा सहभाग?