भाजपच्या वसूली गँगची ईडी सदस्य आणि मोदी त्याचे…संजय राऊतांचा हल्लाबोल

| Updated on: Mar 17, 2024 | 1:17 PM

'काँग्रेस नसती देश स्वतंत्र झाला नसता, काँग्रेस नसती तर देशाला नेतृत्व मिळाले नसते, काँग्रेस नसती तर पाकिस्तानचे दोन तुकडे झाले नसते. काँग्रेस नसती तर विकास आणि विज्ञान तंत्रज्ञानात झालेले प्रगती नसती, काँग्रेस नसती तर देश अखंड राहिला नसता'

मुंबई | 17 मार्च 2024 : काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा सध्या सुरु आहे. मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर आज या यात्रेची सांगता सभा होणार आहे. याआधी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीकास्त्र डागलंय. काँग्रेस नसती देश स्वतंत्र झाला नसता, काँग्रेस नसती तर देशाला नेतृत्व मिळाले नसते, काँग्रेस नसती तर पाकिस्तानचे दोन तुकडे झाले नसते. काँग्रेस नसती तर विकास आणि विज्ञान तंत्रज्ञानात झालेले प्रगती नसती, काँग्रेस नसती तर देश अखंड राहिला नसता, अशा अनेक गोष्टी आहेत. या गोष्टी भाजपवाले समजू शकत नाही. ते देशाचा विचार करत नाही. ते फक्त व्यापारी आणि उद्योगपतींचा विचार करतात. जिथे राजा व्यापारी असतो, तिथे प्रजा भिकारी असते. देशाला भिकारी करण्याचे काम भाजपवाले करत आहेत. त्यांनी काँग्रेस आणि शिवसेनेकडून भूमिका आणि विचारधारा शिकण्याची गरज आहे. भाजप नसता तर देशात दंगली झाल्या नसत्या, देशाचा रुपया मजबूत झाला असता, देशाची प्रतिष्ठा वाढली असती, देशावरील कर्ज कमी झाले असते. देशात राफेलपासून इलेक्ट्रोरल बॉन्डपर्यंतचे घोटाळे झाले नसते, त्यामुळे भाजप नसती तर अनेक गोष्टी झाल्या असत्या, असे म्हणत संजय राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल केलाय.

Published on: Mar 17, 2024 01:17 PM
लोकसभेच्या तोंडावर ठाकरे गटाला मोठा धक्का, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ‘हा’ आमदार बांधणार शिवबंधन
भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान जितेंद्र आव्हाड संतापले, ‘तो’ व्हिडीओ तुफान व्हायरल