देवेंद्र फडणवीस राजकारणातलं कच्चं मडकं, ठाकरे गटातील बड्या नेत्याचा घणाघात
देवेंद्र फडणवीस हे राजकारणातलं कच्चं मडकं असल्याचे वक्तव्य करत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केलं. देवेंद्र फडणवीसांच्या मुलाखतीवरून संजय राऊत यांनी सडकून टीका केली आहे. संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेला शिंदे यांच्या शिवेसेनेचे नेते आणि आमदार संजय शिरसाट यांनी पलटवार केलाय.
देवेंद्र फडणवीस यांना फार गांभीर्याने घेऊ नका, देवेंद्र फडणवीस हे राजकारणातलं कच्चं मडकं असल्याचे वक्तव्य करत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जिव्हारी लागणारी टीका केली आहे. देवेंद्र फडणवीसांच्या मुलाखतीवरून संजय राऊत यांनी सडकून टीका केली आहे. संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेला शिंदे यांच्या शिवेसेनेचे नेते आणि आमदार संजय शिरसाट यांनी पलटवार केलाय. तर एखाद्या दलालाच्या तोंडी असं वाक्य शोभत नाही, असं म्हणत संजय शिरसाट यांनी संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. इतकंच नाहीतर देवेंद्र फडणवीस पक्ष मजबुत करत आहेत तर संजय राऊत हे पक्षाची इज्जत घालवत आहेत, असंही संजय शिरसाट यांनी म्हटले असून संजय शिरसाट यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
Published on: May 12, 2024 05:13 PM