लोकसभेसाठी ठाकरे गट २३ जागा लढणार? राऊत यांचा दावा काय? मग पवार गट अन् काँग्रेसला किती जागा?
लोकसभेच्या निवडणुकीसाठी ठाकरे गटाने २३ जागांवर दावा केलाय. दिल्लीत काँग्रेसच्या हायकमांड सोनिया गांधी, राहुल गांधी आणि मल्लिकार्जून खर्गे यांच्याशी चर्चा झाली असून २३ जागांवर आम्हीच लढणार असं संजय राऊत म्हणाले
मुंबई, २३ डिसेंबर २०२३ : लोकसभेच्या निवडणुकीसाठी ठाकरे गटाने २३ जागांवर दावा केलाय. दिल्लीत काँग्रेसच्या हायकमांड सोनिया गांधी, राहुल गांधी आणि मल्लिकार्जून खर्गे यांच्याशी चर्चा झाली असून २३ जागांवर आम्हीच लढणार असं संजय राऊत म्हणाले. त्यामुळे महाविकास आघाडीत आम्हीच मोठा भाऊ असल्याचे ठाकरे गट दाखवून देतोय. पण २३ जागांची मागणी काँग्रेसला पटली नसल्याचे दिसून आले आहे. २०१९ मध्ये लढवलेल्या भाजप आणि शिवसेनेची युती असताना लोकसभेच्या ४८ जागांपैकी भाजपने २५ तर शिवसेनेने २३ जागा लढल्या यामध्ये भाजपने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. त्यावेळी जेवढ्या जागा लढल्या तेवढ्याच इंडिया आघाडीतही लढणार, असं ठाकरे गटाकडून संजय राऊत यांनी म्हटलंय. लोकसभेच्या निवडणुकीबाबत नेमकं काय म्हणाले संजय राऊत?
Published on: Dec 23, 2023 11:13 AM