मविआ लोकसभेला किती जागा जिंकणार?, संजय राऊत यांनी स्पष्ट आकडाच सांगितला
VIDEO | 2024 ची निवडणूक विरोधक एकत्र लढणार? लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात नेमकं काय होणार? संजय राऊत यांनी सविस्तर सांगितलं
नवी दिल्ली : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काय होणार आहे हे स्पष्टच सांगितलं आहे. महाराष्ट्रातील 48 पैकी 40 जागा महाविकास आघाडी जिंकणार आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. काल दिल्लीत ज्येष्ठ नेते शरद पवार आणि राहुल गांधींची चर्चा झाली. त्यापूर्वी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट झाली. राहुल गांधी हे ममता बॅनर्जींना भेटणार आहेत. त्याचं स्वागत करतो. विरोधक एकत्र येऊ नये असा भाजपचा भ्रम आहे, तो तुटणार आहे. 2024ला विरोधक एकत्र येतील. काँग्रेस महासचिव केसी वेणूगोपाल मुंबईत येत आहेत. ते उद्धव ठाकरे यांना भेटतील. त्यानंतर खरगे आणि राहुल गांधी यांच्याशी भेट होऊ शकते, असं संजय राऊत म्हणाले. काल दिल्लीत पवार खरगे आणि राहुल गांधी यांची भेट झाली. या देशातील प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांना भेटून एकत्र येण्यासाठी राहुल गांधी काम करत आहेत. आम्ही त्यात आहोत. ममहाराष्ट्रात काय होईल असं म्हणाल तर आम्ही 48 पैकी 40 जागा जिंकू, असा दावा त्यांनी केला.