संजय राऊत यांचा नारायण राणे यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा, काय आहे प्रकरण?

| Updated on: Apr 21, 2023 | 12:02 PM

VIDEO | ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याकडून भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा, काय आहे दावा दाखल करण्याचे कारण?

मुंबई : राज्यातील राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. संजय राऊत यांनी नारायण राणेंच्या विरोधातील हा दावा मुलुंड कोर्टात दाखल केला आहे. फेब्रुवारी महिन्यात नारायण राणे यांनी संजय राऊत यांच्या विरोधातील एक वक्तव्य केले होते. ते म्हणजे राज्यसभेवर निवडून आणण्यासाठी मी पैसे खर्च केले असून त्यांचे मतदास यादीत नाव नव्हतं. राणे यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर संजय राऊतांकडून त्यांना रितसर नोटीस पाठवण्यात आली होती. यामध्ये राऊतांनी असे म्हटले होते की, हे वक्तव्य केले त्याबाबतचे संबंधित पुरावे सादर करा. मात्र राऊतांनी पाठवलेल्या नोटीसीनंतर नारायण राणे यांना कोणत्याही प्रकारचे उत्तर देण्यात आले नव्हते. त्यामुळे आता मुलुंड कोर्टात हा दावा राऊत यांनी केला असून यासंदर्भातील खटला पुढे सुरू राहणार आहे. त्यामुळे नारायण राणे यांना कोर्टात मात्र याचे उत्तर द्यावेच लागणार असल्याचे पाहायला मिळत आहे.

Published on: Apr 21, 2023 12:02 PM
तक्रारीवरून राऊत भडकले, म्हणाले, सरकारविरोधात गुन्हा दाखव करा
अन् एसी लोकलचे प्रवाशी घामाघूम, पश्चिम रेल्वे मार्गावरील वेळापत्रक कोलमडलं, पण का?