पुढचा मुख्यमंत्री ‘मविआ’चा होणार ! कुणी केला मुख्यमंत्रिपदाबाबतचा मोठा दावा?
VIDEO | राज्याच्या राजकारणात मुख्यमंत्री, मुख्यमंत्री पद यावर चर्चा सुरू असताना मुख्यमंत्रिपदाबाबतचा या नेत्यानं नेमका काय केला मोठा दावा?
मुंबई : गेल्याकाही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात मुख्यमंत्री, मुख्यमंत्री पद यावर चर्चा सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. तर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरू होत्या मात्र त्यावर त्यांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन पूर्णविराम दिला होता. त्यानंतर अजित पवार यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छाही बोलून दाखवली होती तर दुसरीकडे १५ ते २० दिवसांत शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला असून दिल्लीत तशा हलचाली सुरू असल्याचा दावाही त्यांनी केला होता. मात्र आता पुढील मुख्यमंत्री हा मविआचा होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुढचा मुख्यमंत्री महाविकास आघाडीचा होणार असल्याचं वक्तव्य केले आहे. राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री चालेल असे बोललो नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. माध्यमांच्या काही प्रतिनिधींनी संजय राऊत यांना मुख्यमंत्रीपदाबाबत प्रश्न विचारला असता त्यावर संजय राऊत यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.