‘वर्षा’ आणि CM कार्यालयातून गुंड टोळ्यांचं मॉनिटरिंग? मुख्यमंत्री शिंदेंवर कुणाचे गंभीर आरोप?

| Updated on: Feb 05, 2024 | 4:29 PM

'अटक केलेल्या गुंडांची जामिनावर जेलमधून सुटका केली जात आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या राज्यात कायद्याचं राज्य यावं असं वाटत असेल किंवा त्यांना कायद्याची चाड असेल तर देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री म्हणून काम करावं', संजय राऊत यांचा खोचक सल्ला

मुंबई, ५ फेब्रुवारी २०२४ : ‘वर्षा’ बंगला आणि मुख्यमंत्री कार्यालयातून गुंड टोळ्यांचं मॉनिटरिंग होत असल्याचे म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अटक केलेल्या गुंडांची जामिनावर जेलमधून सुटका केली जात आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या राज्यात कायद्याचं राज्य यावं असं वाटत असेल किंवा त्यांना कायद्याची चाड असेल तर देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री म्हणून काम करावं, असा खोचक सल्लाही संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला. तर एकनाथ शिंदे यांच्या दहशतीखाली देवेंद्र फडणवीस आहेत का? असा सवाल संजय राऊत यांनी करत देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाहोल केला आहे. महाराष्ट्रात गुंडगिरीचा डाग लागतोय त्याच्यात फडणवीस योगदान देताय का? असा सवालही त्यांनी केलाय.

Published on: Feb 05, 2024 04:29 PM
संजय राऊत यांनी केली किरीट सोमय्यांची नक्कल अन् काय दिलं थेट आव्हान?
प्रचार ना रॅली…राजकीय कामात लहान मुलांचा वापर नाही; निवडणूक आयोगाची नियमावली नेमकी काय?