शिवसेना अन् शरद पवार यांच्यात नेमकी कोणती कमिटमेंट? संजय राऊत यांनी थेट सांगितलं….

| Updated on: Apr 30, 2023 | 12:50 PM

VIDEO | संजय राऊत यांनी सांगितली शिवसेना अन् शरद पवार यांच्यातील कमिटमेंट, म्हणाले...

मुंबई : ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी कर्नाटकातील निवडणूक प्रचारावरून भाजप आणि शिंदे गटावर जोरदार हल्ला चढवला आहे. यावेळी त्यांनी शिवसेना अन् शरद पवार यांच्यात नेमकी कोणती कमिटमेंट आहे यावर देखील भाष्य केले आहे. राऊत म्हणाले, बेळगावातील एकीकरण समितीच्या प्रचाराला आम्ही स्वतः जातोय. राष्ट्रवादीचे काही प्रमुख नेते एकीकरण समितीच्या प्रचाराला जाताय. मराठी भाषिकांचा बेळगाव कारवार जो सीमाभाग आहे, याबाबत आमची कमिटमेंट आहे. विशेष करून एकीकरण समिती महाऱाष्ट्रातील शिवसेना आणि शरद पवारांची यासंदर्भात कमिटमेंट असल्याचे म्हणत त्यांनी अनेक वर्ष या आंदोलनात सहभागी असल्याचे सांगितले. त्यावेळी बेळगाव सीमाप्रश्नाप्रकरी बाळासाहेब ठाकरे यांनी तीन महिन्यांचा कारावास झाला होता ते विसरण्यासारखे नाही. शिवसेनेच्या ६९ शिवसैनिक मुंबई, महाराष्ट्र आणि बेळगावमध्ये मारले गेले. त्यामुळे बेळगावमध्ये एकीकरण समितीच्या पाठिशी उभं राहणं. ही आमची कमिटमेंट असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

 

 

Published on: Apr 30, 2023 12:49 PM
मुंबईत शाह का आले असतील?; राऊत यांनी दिले ‘हे’ उत्तर
निवडणूक छोटी असली तरी प्रतिष्ठेची, ही निवडणूक कार्यकर्त्यांची!; मतदानाच्या दिवशी सुरेश धस यांची प्रतिक्रिया