I Repeat… तेव्हा भाजप हा पक्ष शिल्लक नसेल, संजय राऊतांचा इशारा काय?
भ्रष्टाचाराला समर्पण देणारी पार्टी आणि भ्रष्टाचारी काम करणारी पार्टी, ही भाजपची ओळख आहे. त्यांनी आरशात बघितलं तर त्यांना फक्त भ्रष्टाचार दिसणार, असे म्हणत राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासह भारतीय जनता पार्टीला गंभीर इशारा दिलाय.
मुंबई, १८ मार्च २०२४ : आमच्या हातात जेव्हा ईडी, सीबीआय येईल तेव्हा भारतीय जनता पक्ष संपलेला असेल असे म्हणत शिवसेना उबाठा गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपला गंभीर इशारा दिला. भारतीय जनता पार्टी ही भ्रष्टाचार पार्टी आहे. भ्रष्टाचाराला समर्पण देणारी पार्टी आणि भ्रष्टाचारी काम करणारी पार्टी, ही भाजपची ओळख आहे. त्यांनी आरशात बघितलं तर त्यांना फक्त भ्रष्टाचार दिसणार, असे म्हणत राऊत म्हणाले, “ज्या दिवशी केंद्रात आमच्या हातामध्ये ईडी आणि सीबीआय येईल तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी हे वाक्य पुन्हा ऐकून दाखवावं. त्यावेळी भारतीय जनता पक्ष शिल्लक राहिला नसेल. लोहा लोहे को काटता है, हे आम्हालाही माहिती आहे. फक्त त्यांनाच माहित आहे असं नाही. मी पुन्हा सांगतो ज्या दिवशी आमच्या हातात ईडी-सीबीआयसह सत्ता येईल, त्या दिवशी फडणवीसांनी त्यांचा पक्ष वाचवून दाखवावा” असं संजय राऊत म्हणाले.