Sanjay Raut : मिलावट काय करता? तुमची सडलेली भेळपुरी झालीय; संजय राऊत भडकले
VIDEO | राज्याच्या मुख्यमंत्र्यांना समाजवादाची व्याख्या विचारा? आक्रमक झालेल्या संजय राऊत यांनी टीका करणाऱ्यांना फटकारलं, म्हणाले, 'विधिमंडळाच्या ग्रंथालयात जा, जुना रेकॉर्ड तपासा. समाजवाद काय असतो ते समजून घ्या, तुम्ही कसली म्हणताय मिलावट? तुमचीच सडलेली भेळपुरी झालीये'
मुंबई, १६ ऑक्टोबर २०२३ | राज्याच्या मुख्यमंत्र्यांना समाजवादाची व्याख्या विचारा? असा सवाल करत संजय राऊत म्हणाले, ज्या शिवसेनेत शिंदे होते. स्वत:ला बाळासाहेब ठाकरेंचे पाईक म्हणतात, त्यांना बाळासाहेब ठाकरे आणि समाजवादी नेत्यांचे काय संबंध होते हे विचारा जरा. जॉर्ज फर्नांडिस, मधू दंडवते, एसएम जोशी आणि नाना गोरे आणि बाळासाहेब ठाकरे यांनी एकमेकांवर टीका टिप्पण्या जरूर केल्या. पण महाराष्ट्राच्या हितासाठी समाजवादी पक्षाचे अनेक नेते आणि बाळासाहेब एकत्र आले. मग संयुक्त महाराष्ट्राचा लढा असेल, मग सीमा प्रश्नाचा लढा असेल, अशा अनेक प्रश्नांमध्ये प्रजा सोशॅलिस्ट पार्टी आणि शिवसेना एकत्र आली होती, असं संजय राऊत म्हणाले. विधिमंडळाच्या ग्रंथालयात जा, जुना रेकॉर्ड तपासा. समाजवाद काय असतो ते समजून घ्या, असा सल्लाही राऊतांनी दिला. तर महापालिकेचा कारभार मराठीत व्हावा यासाठीचा पहिला प्रस्ताव जॉर्ज फर्नांडिस यांनी आणला. हा इतिहास आहे आणि तो पुसला जाणार नाही. तुम्ही कसली म्हणताय मिलावट? तुमचीच सडलेली भेळपुरी झालीये, अशी टीका केली.