‘ये तो चायना मेड माल है…’, संजय राऊत यांचा रोख नेमका कुणावर? बघा काय म्हणाले?
VIDEO | ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आजच्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे, बघा काय केली टीका?
मुंबई, ७ ऑक्टोबर २०२३ | ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आजच्या पत्रकार परिषदेत मोठं वक्तव्य केले आहे. शिवसेना फोडण्याची हिंमत केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यात नाही, असे म्हटले. तर राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या स्वागताचे फलक शिंदे यांच्या शिवसेनेकडून लावण्यात आल्याने राऊत यांनी सडकून टीका केली आहे. राऊत म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी जे पी नड्डा यांच्या स्वागताचे फलक लावले. ही काय वेळ आली आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे चेले म्हणवता तुम्ही आणि नड्डा यांच्या स्वागताचे मोठाले फलक लावता? ही लुच्चेगिरी, ही लाचारी? तुम्ही जी शिवसेना म्हणताय ना स्वत:ला? असली शिवसेना आहात तर हे कुठून आलं? ही कोणती शिवसेना आहे? ये तो चायना मेड माल है, असे म्हणत राऊत यांनी शिंदे गटावर आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
Published on: Oct 07, 2023 02:24 PM