…तरीही कर्नाटकात दारूण पराभव, संजय राऊत यांनी पुन्हा भाजपला डिवचलं
VIDEO | मोदी, अमित शाह यांना प्रचाराला येऊ दे, इथे तंबू ठोकून बसलात तरी..., संजय राऊत यांनी काय दिलं चॅलेंज?
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात कोणता निकाल गेला, वातावरण विरोधात गेलं की त्यावर पाणी टाकण्यासाठी उलटसुलट निर्णय घेतले जातात हा आतापर्यंतचा इतिहास आहे, असं म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोदींवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, कर्नाटकमधला भाजपाचा पराभव अत्यंत दारुण आहे. भाजपाला या देशाची मानसिकता काय झाली आहे हे दाखवून देणारा निकाल आहे. कर्नाटक हे दक्षिणेतलं महत्त्वाचं राज्य आहे. दक्षिणेत सर्वाधिक प्रखर हिंदुत्व पाहण्यास मिळतं. कर्नाटक राज्यात सर्वात जास्त मंदिरं आहेत. लोक श्रद्धाळू आहेत. कर्नाटकसारख्या राज्यात हिंदूंचे सर्वात जास्त सण आणि उत्सव साजरे केले जातात. या हिंदुत्ववादी राज्याने, श्रद्धाळू राज्याने नरेंद्र मोदी, अमित शाह आणि भाजपाचा दारूण पराभव केला आहे. हे सत्य भाजपाचे लोक का स्वीकारत नाहीत? असाही सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे. असेच पराभव तुमच्या वाट्याला येणार असल्याचा इशाराही संजय राऊत यांनी दिला. पालिकेच्या निवडणुका घेण्यासाठी का टाळाटाळ करत आहात? मुंबई, ठाण्यासह 14 महापालिकेच्या निवडणुका घेण्याची हिंमत का दाखवत नाही? मोदी-शाह यांना प्रचाराला येऊ द्या ना. कुणालाही प्रचारा येऊ द्या. इथे तंबू ठोकून बसा प्रत्येक पालिकेच्या हद्दीत. कुठेही जा. पण निवडणुका घ्या. मग दाखवू आम्ही तुम्हाला जनमत कुणाच्या बाजूने आहे आणि कुणाला जागा मिळतात, असेही संजय राऊत म्हणाले.