Sanjay Raut : संजय राऊत यांची पुन्हा भविष्यवाणी? म्हणाले, राज्यातील सरकार जाण्याची वेळ आली
VIDEO | जितकी वेळं आयसीयूमध्ये ठेवून वाचवायचं होतं, तितकं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी वाचवण्याचा प्रयत्न केला आहे. तर आता विधानसभा अध्यक्ष यांना आयसीयूमध्ये जाण्याची वेळ येईल, असे म्हणत संजय राऊत यांनी जोरदार टीका केली. यासह सरकारबाबत काय केली भविष्यवाणी?
मुंबई, १३ ऑक्टोबर २०२३ | राज्य सरकार जाण्याची वेळ आता आली आहे, असे म्हणत संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. जितकी वेळं आयसीयूमध्ये ठेवून वाचवायचं होतं, तितकं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी वाचवण्याचा प्रयत्न केला आहे. तर आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना आयसीयूमध्ये जाण्याची वेळ येईल, असे म्हणत संजय राऊत यांनी हल्लाबोल केलाय. सर्वोच्च न्यायालयाला नौटंकी समजत असल्याचे म्हणत संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. आज सर्वोच्च न्यायालयाने सौ सोनार की एक लोहार की दिली आहे. यातून जर विधानसभा अध्यक्ष आणि त्यांच्या पालकांना शहानपणा घेतला तर बरा आहे. आम्हाला आदेश देण्याचा अधिकार आहे असं समजू नका. आम्ही तुमचा मान राखतोय. पण यांना मान घ्यायचा नसेल तुम्हाला मान घेता येत नसेल. कारण हे दहा पक्ष फिरून बारा गावाचं पाणी पिऊन खुर्चीवर बसलेले लोकं असल्याचे म्हणत संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.