त्यांचा पक्ष इतका मोठा नाही आणि…, संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना डिवचले
VIDEO | संजय राऊत यांनी घेतला राज ठाकरे यांच्या टीकेचा समाचार, बघा काय म्हणाले संजय राऊत?
मुंबई : आमच्या वाट्याला गेले म्हणून मुख्यमंत्रीपद गेले, अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली होती. मनसेच्या वर्धापन दिनानिमित्त ते ठाण्यात बोलत होते. यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्या टीकेचा चांगलाच समाचार घेतला आणि त्यांना डिवचले. मनसेला पक्षाची वाढ करण्याची अजून गरज आहे, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. राज ठाकरे यांच्या टीकेचा समाचार घेताना संजय राऊत म्हणाले, त्यांच्या वाटेला जाण्या इतका त्यांचा पक्ष मोठा नाहीये. सरकार का गेलं हे अख्ख्या जगाला माहीत आहे. त्यांना माहीत नसेल तर त्यांच्या पक्षाची वाढ व्यवस्थित होणं गरजेचं आहे. महाराष्ट्रातील सरकार फक्त ईडी, सीबीआय या यंत्रणांचा गैरवापर करून पाडण्यात आलं. आणि जोडीला खोके होतेच. ईडी काय आहे हे मनसे प्रमुखांना मी सांगायला नको. त्यांनी त्याचा चांगला अनुभव घेतला आहे.