‘नितेश राणे यांना राजकारणातली अक्कलदाढ अजून यायचीये’, कुणाची सडकून टीका
VIDEO | 'भाजपने नितेश राणे यांना फक्त उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेवर भुंकण्यासाठी पाळलंय', कुणाचा हल्लाबोल?
सिंधुदुर्ग : नितेश राणे (Nitesh Rane) यांना राजकारणातली अक्कलदाढ अजून यायची आहे, असे म्हणत ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी भाजप नेते नितेश राणे यांच्यावर खोचक टीका केली. तर विनायक राऊत पुढे असेही म्हणाले की, भाजपने नितेश राणे यांना फक्त उद्धव ठाकरे यांच्यावर आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेवर भुंकण्यासाठी पाळलं आहे. जेवढे काय भुकायंच आहे ते भूकं असे म्हणत विनायक राऊत यांनी नितेश राणे यांच्यावर जहरी टीका केली आहे. नितेश राणे यांच्यावर हल्लाबोल करत असताना विनायक राऊत म्हणाले, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत नितेश राणे यांचा बाजार उठवणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. यासह रत्नागिरीतील बारसू रिफायनरी प्रकल्पासंदर्भात विनायक राऊत यांनी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांच्यावरही निशाणा साधला. नारायण राणे यांनी स्वतःचा इतिहास, भूतकाळ आठवावा. रिफायनरी विरोधात तेव्हा केवढ्या गमजा मारल्या होत्या, केवढे मोठे मोर्चे काढले होते. राणे सत्तेच्या लाचारीसाठी केवळ रिफायनरीचे समर्थन करता आहेत. नारायण राणेंना हिंमत असेल तर त्यांनी रिफायनरी होत असलेल्या गावात पाय ठेवून दाखवावा, असं थेट आव्हान विनायक राऊत यांनी राणेंना दिले आहे.