राज ठाकरे यांची रत्नागिरीची सभा म्हणजे पिकनिक, कुणी लगावला खोचक टोला?

| Updated on: Apr 23, 2023 | 11:26 AM

VIDEO | येत्या ६ मे रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची रत्नागिरीत जाहीर सभा, सभेपूर्वीच राज ठाकरेंच्या सभेवर कुणाचा निशाणा

सिंधुदुर्ग : येत्या ६ मे रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची रत्नागिरीत जाहीर सभा होणार आहे. या सभेची मनसेकडून जोरदार तयारी सुरू असताना दुसरीकडे ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून राज ठाकरे यांच्यासभेवर टीकास्त्र डागण्यात आलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची रत्नागिरीतील सभा म्हणजे पिकनिक आहे, असा खोचक टोला ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी लगावला आहे. ते पुढे असेही म्हणाले की, राज ठाकरे यांनी रत्नागिरीत यावं पिकनिक करावी आणि निघून जावं. राज ठाकरे यांची आणि त्यांच्या सभेची आम्ही दखल घेत नाही. तर आजच्या जळगावातील पाचोऱ्यातील उद्धव ठाकरे यांच्या सभेवर देखील विनायक राऊत यांनी भाष्य केले आहे. गुलाबराव पाटल यांनी सभेवरती दगड फेकावा आणि दगडा सहित घरी जावं, असे खोचकपणे म्हणत उद्धव ठाकरे यांची पाचोरा येथील सभा पाहूनच गुलाबराव पाटील यांचे डोळे बंद होतील, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. तर गुलाबरावांचे गुलाब फुलणार की नाही याची भीती गुलाबराव पाटील यांना आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या सभेसंदर्भात त्यांचाच त्रागा सुरू असल्याचे विनायक राऊत यांनी म्हटले आहे.

Published on: Apr 23, 2023 11:26 AM
काही दगड सोनं म्हणून आमच्याकडे होते, पण ते दगडच निघाले; राऊतांचा कोणावर घणाघात
दुपारी कडाक्याचं ऊन अन् संध्याकाळी अवकाळी पाऊस, ऊन-पावसाच्या खेळानं नागरिक हैराण