मग कर्मचाऱ्यांवर अन्याय का? मिंधे सरकार म्हणत विनायक राऊत यांनी जुनी पेन्शनबाबत केला हल्लाबोल
VIDEO | मिंधे सरकारने जुनी पेन्शनकडे लक्ष द्यावं, विनायक राऊत यांनी केला गंभीर आरोप
सिंधुदुर्ग : सरकार केवळ जाहीरातीवर साठ ते सत्तर कोटी रूपये खर्च करत आहेत. चहापानावर करोडो रूपये उडवणं, हे सध्या मिंधे सरकारचे काम सुरू असल्याची टीका ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी शिंदे सरकारवर केली आहे. असे कामं करण्यापेक्षा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना का हवी आहे, याचा अभ्यास करा असा खोचक सल्ला विनायक राऊत यांनी शिंदे फडणवीस सरकारला दिला आहे. जर या देशातील ८ राज्य जुनी पेन्शन योजना राबवत असतील तर केंद्रात तुमचीच सत्ता आहे. केंद्राकडून निधी मिळत असेल तर सरकारी कर्मचाऱ्यांवर जुनी पेन्शन योजने संदर्भात अन्याय का करता असा प्रश्न खासदार विनायक राऊत यांनी सरकारला विचारला आहे. बघा काय म्हणाले विनायक राऊत…
Published on: Mar 17, 2023 11:24 AM