‘गद्दारांना गाडायचं आणि पुन्हा ठाकरेंचा भगवा फडकवायचा’, राऊतांचं शिवसैनिकांना आवाहन

| Updated on: Mar 25, 2023 | 3:18 PM

VIDEO | पुन्हा उद्धव ठाकरे यांचा भगवा फडकणार, ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी विश्वास व्यक्त करत काय म्हटले...

मालेगाव : शिवसेनेत मोठी फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांचे राज्यभरात दौरे सुरू असून यामध्ये शिवगर्जना शिवसंकल्प सभा घेताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे यांची कोकणातील खेडमध्ये पहिली जाहीर सभा झाली. यावेळी त्यांनी शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला. आता दुसरी सभा मालेगावात होत आहे. ही सभा २६ मार्च रोजी मालेगावच्या सयाजी महाराज गायकवाड महाविद्यालयाच्या मैदानावर सांयकाळी पाच वाजता होणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या सभेला एकच दिवस बाकी असताना या सभेची तयारी सुरू असून बारकाईने लक्ष देण्यासाठी ठाकरे गटाचे विनायक राऊत आणि संजय राऊत मालेगावात गेले आहेत. यापूर्वीच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, विनायक राऊत यांच्या हस्ते मालेगाव शहरातील शिवसेना कार्यालय उद्घाटन करण्यात आले आहे. यावेळी संजय राऊत, विनायक राऊत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी आपली हजेरी दर्शवली. यावेळी विनायक राऊत यांनी शिंदेच्या शिवनेवर जोरदार निशाणा साधला बघा काय म्हणाले विनायक राऊत…

Published on: Mar 25, 2023 03:15 PM
हिंमत असेल तर संजय राऊत यांनी ग्रामपंचायत सदस्यपदी निवडून येऊन दाखवावं; शिवसेना नेत्याचं आव्हान
मुख्यमंत्रिपद गेलं, चिन्ह-पक्ष गेला, मंत्री आमदारही गेले, आता दारोदारी फिरावं लागतंय; उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र