सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीमुळे ‘मविआ’त गोंधळ, ‘सामना’तून काँग्रेसला टोला
'फडणवीस यांनी एका कार्यक्रमात सत्यजित तांबे यांना पाठिंबा देण्याचे संकेत दिले होते. त्यानंतरही काँग्रेसच्या नेतृत्वाला जाग नाही', नेमके काय म्हटले सामना अग्रलेखात?
काँग्रेस नेते सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीवरून शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गट) मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून काँग्रेसला आज टोला लगावण्यात आला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी संकेत दिल्यानंतरही काँग्रेस नेतृत्वास जाग आली नाही, असे आजच्या सामना अग्रलेखात म्हटले आहे.
सत्यजित तांबे यांना भाजपने पाठिंबा देण्याची भाषा सुरू केल्याने काँग्रेसच नव्हे तर सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीवरून महाविकास आघाडीतही गोंधळ उडाला आहे. या मुद्द्यावरून ठाकरे गटाने आता काँग्रेसला खडेबोल सुनावले आहेत. एका आमदारकीसाठी तांबे यांनी प्रतिष्ठा घालवली आहे, असे म्हणत ठाकरे गटाने काँग्रेसलाही सुनावले आहे. तर सत्यजित तांबे यांना एका आमदारकीसाठी भाजपच्या खेळीचे बळी व्हावे, हे पटणारे नाही, असे म्हणत दैनिक सामनाच्या अग्रलेखातून ठाकरे गटाने नाराजी व्यक्ती केली आहे.
Published on: Jan 14, 2023 11:14 AM