कसली गॅरंटी… ठाकरेंची वाघीण जीवाच्या आकांताने राणेंना भिडली, राजकोट किल्ल्यावर नक्की काय घडलं?

| Updated on: Aug 28, 2024 | 4:10 PM

मालवणमधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजाी महाराजांचा पुतळा कोसळला त्या ठिकाणी महाविकास आघाडीचे नेते कार्यकर्ते आणि भाजप नेत्यांकडून पाहणी करण्यात आली. यावेळी ठाकरे आणि राणे समर्थक आमने-सामने आलेत आणि त्यांच्यात मोठा राडा झाल्याचे पाहायला मिळाले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण भागात असलेल्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा सोमवारी कोसळल्याची घटना घडली. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात विरोधक आणि शिवप्रेमींमधून संतापाची भावना व्यक्त होत आहे. गेल्या वर्षी 4 डिसेंबरला नौदलच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण कऱण्यात आलं होतं. मात्र 8 महिने 22 दिवसांत 28 फूट उंचीचा पुतळा कोसळला कसा? असा सवाल सध्या उपस्थितीत केला जात आहे. आज भाजप नेते निलेश राणे आणि नारायण राणे दोघेही राजकोट किल्ल्यावर उपस्थित होते. मात्र याच वेळी मविआ नेते तिथे दाखल झाल्याने निलेश राणे यांनी पोलिसांशी हुज्जत घातली. यादरम्यान, राणे समर्थक आणि ठाकरे समर्थक दोन्ही बाजूचे कार्यकर्ते एकमेकाच्या अंगावर धावून गेल्याचे पाहायला मिळाले. तर यावेळी ठाकरेंची एक वाघीण राणेंना भिडल्याचे पाहायला मिळाले. बघा नेमकं काय घडलं?

Published on: Aug 28, 2024 04:10 PM
राजकोट किल्ल्यावर मविआ-भाजप कार्यकर्ते भिडले, राड्यात जयंत पाटलांची मध्यस्थी
‘एक कॉल अन् प्रॉब्लेम सॉल्व्ह’, महिला सरपंचाचं होतंय कौतुक; काय आहे अनोखा उपक्रम?