‘मला जीवानिशी संपविण्याचा कट’, शिवसेनेच्या ‘या’ नेत्यावर रंजना पौळकर यांचा गंभीर आरोप

| Updated on: Apr 18, 2023 | 1:08 PM

VIDEO | 'मला जीवानिशी संपविण्याचा कट केला', ठाकरे गटाच्या शहर महिला प्रमुख रंजना पौळकर यांचा गंभीर आरोप? बघा काय म्हणाल्या...

वाशिम : वाशिमच्या अनसिंग मार्गावर शिवसेना ठाकरे गटांच्या माजी वाशिम शहर महिला प्रमुख रंजना पौळकर यांचा एप्रिल 2022 मध्ये अपघात झाला होता. त्या अपघातात रंजना पौळकर गंभीर जखमी झाल्या होत्या. तो अपघात शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख सुरेश मापारी यांनी काही लोकांना हाताशी धरून केल्याचा आरोप रंजना पौळकर यांनी आज केला. त्या दरम्यान तक्रारीनुसार अद्याप यातील दोषींवर कोणतीही कारवाई करण्यात न आल्यानं त्यावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी आज केली. हा अपघात नसून जीवानिशी संपविण्याचा कट असल्याचं ही त्यांनी म्हटलं आहे. त्यानंतर ही चाकूने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली होती. माझ्यावर दोन वेळा करण्यात आलेल्या प्राणघातक हल्ल्याचा सक्षम यंत्रणेमार्फत तपास करून मला न्याय द्यावा अन्यथा मी 24 एप्रिलपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसणार असल्याचा इशारा ही रंजना पौळकर यांनी दिला आहे.

Published on: Apr 18, 2023 01:08 PM
कोण-कधी-कुठं जाणार याबद्दल काही सांगता येईना पण अजितदादा…; युतीतील आमदाराचं महत्वाचं वक्तव्य
अजित पवार यांच्या चर्चेदरम्यान उद्धव ठाकरे यांचं सूचक वक्तव्य; म्हणाले, ‘मला एकट्याला…’