काल झालेली खेडची सभा ही ‘ढ’ विद्यार्थ्यांची, ठाकरे गटाच्या आमदाराचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

| Updated on: Mar 20, 2023 | 2:37 PM

VIDEO | ठाकरे घराण्याचे उपकार म्हणून रामदास कदम मंत्री, ठाकरे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल; बघा काय केली टीका

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा झाली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. या टीकेला ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. काल खेडमध्ये झालेली सभी ही ढ विद्यार्थ्यांची सभा होती, असा निशाणा भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सभेवर लगावला. पुढे ते असेही म्हणाले की, उद्धव ठाकरे यांची सभा ही पाच मार्चला झाली. त्याच मैदानावर झाली. मात्र आमच्या सभेचा विक्रम आणि आमच्या सभेचा उच्चांक हा त्यांच्या डोळ्यासमोर होता. त्यामुळे त्यांनी जवळ जवळ अर्ध्या महाराष्ट्रातून माणसं नेली. असे असले तरी ते आमच्या सभेच्या जवळपासही पोहोचू शकले नाहीत, असा टोलाही भास्कर जाधव यांनी लगावत कालची मुख्यमंत्र्यांची झालेली सभा ही ढ विद्यार्थ्यांची होती, असे त्यांनी संबोधित केले.

Published on: Mar 20, 2023 02:36 PM
साधा जीआर म्हणजे काय माहित नाही; रामदास कदमांवर उद्धव ठाकरे गटाच्या नेत्याची खोचक टीका
पंकजा मुंडे कार्यकर्त्यांना संबोधित करत होत्या अन् तितक्यात ‘कमळ’ पडलं, नेमकं काय घडलं?