‘कितीही चौकशी झाली तरी…’, ACB च्या चौकशीवर राजन साळवी काय म्हणाले?
VIDEO | राजापूरचे ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांची आज पुन्हा एसीबी चौकशी, काय दिली प्रतिक्रिया...
मुंबई : ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांची आज पुन्हा एकदा एसीबी चौकशी होणार आहे. राजन साळवी यांची ही चौथ्यांदा चौकशी होणार असून आमदार साळवी कुटुंबासह आज संध्याकाळी अलिबाग येथील एसीबी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार असल्याची माहिती राजन साळवी यांनी दिली आहे. दरम्यान आपल्याला त्रास देण्यासाठी हा सगळा खटाटोप घातला जात आहे. मात्र तरीही याआधी चौकशीला सहकार्य केलं आहे आणि यापुढेही करणार आहे, असे देखील राजन साळवी यांनी म्हटले आहे. आमदार राजन साळवी यांची एसीबीकडून चौकशी करण्यात आली, आता यानंतर त्यांच्या कुटुंबीयानाही या चौकशीसाठी हजर रहा अशी नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे आमदार साळवी आपल्या कुटुंबासह अलिबाग येथे चौकशीसाठी हजर राहणार आहे. साळवी कुटुंबीय मुंबईकडून अलिबागच्या दिशेने रवाना होणार असून उद्या शनिवारी देखील दिवसभर साळवी कुटुंबीयांची अलिबाग एसीबी समोर चौकशी होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.