31 डिसेंबरपर्यंत सरकारच्या भविष्याचा फैसला लागणार? संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
काल सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगेची भेट घेतली आणि त्यांच्यात चर्चा झाल्यानंतर जरांगेंनी उपोषण सोडलं. यावेळी जरांगे पाटील यांनी सरकारला २४ डिसेंबरपर्यंत आरक्षण देण्यासाठी डेडलाईन दिली आहे. यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाष्य करत सरकारवर निशाणा साधलाय.
मुंबई, ३ नोव्हेंबर २०२३ | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले होते. मात्र अखेर काल सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगेची भेट घेतली आणि त्यांच्यात चर्चा झाल्यानंतर जरांगेंनी उपोषण सोडलं. यावेळी जरांगे पाटील यांनी सरकारला २४ डिसेंबरपर्यंत आरक्षण देण्यासाठी डेडलाईन दिली आहे. यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाष्य करत सरकारवर निशाणा साधलाय. राऊत म्हणाले, ‘३१ डिसेंबरला सरकार जाणार म्हणून जरांगे यांनी २४ तारीख दिली आहे. तर सरकार २ जानेवारी म्हणतंय. ३१ डिसेंबरपर्यंत सरकारच्या भविष्याचा फैसला लागणार आहे. त्यामुळे सरकार मराठा आरक्षणाची जाबाबदारी घेण्यास तयार नाही. बेकायदेशीर घटनाबाह्य सरकार ३१ डिसेंबरनंतर राज्यात राहणार नाही, हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना माहिती आहे.’, असे म्हणत संजय राऊत यांनी मराठा अरक्षणाच्या मुदतीच्या तारखेवरील घोळावरून निशाणा साधला आहे.