‘जळगावात ५० खोक्यांनी विकली गेलेली गुलाबो गँग’, संजय राऊतांनी कुणावर साधला निशाणा

| Updated on: Apr 23, 2023 | 10:33 AM

VIDEO | उद्धव ठाकरे यांची आज जळगाव जिल्ह्यातील पाचोऱ्यात जाहीर सभा, सभेत भांडाफोड करणार असल्याचा कुणाला दिला इशारा?

जळगाव : उद्धव ठाकरे यांची आज जळगाव जिल्ह्यातील पाचोऱ्यात जाहीर सभा होणार असून ठाकरे गटाकडून या सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. यासभेपूर्वीच शिवेसनेचे नेते मंत्री गुलाबराव पाटील आणि संजय राऊत हे आमने-सामने आल्याचे पाहायला मिळत आहे. यावेळी संजय राऊत यांनी गुलाबराव पाटील यांना इशारा दिला आहे. जळगावमध्ये गुलाबो गँग आहे. ज्यांनी ५०-१०० कोटी रूपये घेऊन शिवसेना सोडली. ही गुलाबो गॅग विकली गेली आहे. या गुलाबो गँगचे सरदार उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला धमक्या देताय, तर जळगाव ही सुवर्ण नगरी आहे. या सुवर्णनगरीतील काही दगडं कालपर्यंत आमच्याकडे होते पण ते दगडच निघाले. आजच्या सभेत त्यांचा आम्ही भांडोफोड करू, असा इशारा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. जळगावच्या पालकमंत्र्यानं कोरोना काळात जिल्हा समितीचे प्रमुख म्हणून चढ्या भावाने कोरोना काळात लागणाऱ्या वस्तूंची खरेदी केली. साधारण 400 कोटींचा घोटाळा कोरोना काळात सामान्य लोकांचे प्राण जात असताना केला, असल्याचा खुलासा संजय राऊत यांनी केला आहे.

Published on: Apr 23, 2023 10:29 AM
माझा बाप चोरला? माझा बाप चोरला? माहीत आहे तर तक्रार द्या, ठाकरेंवर कोणी केली जहरी टीका?
संजय राऊत यांच्या ‘त्या’ आरोपांवर संजय गाडकवाड स्पष्टच म्हणाले, ‘एकनाथ शिंदे यांच्या सारखा माणूस…’