तर उद्धव ठाकरे यांना रोखून दाखवा, संजय राऊत यांचं नारायण राणे यांना थेट आव्हान
VIDEO | येऊ देणार नाही म्हणजे काय?, अशा धमक्या देणाऱ्यांना फडणवीसांनी अटक करावं; संजय राऊत यांनी काय केली मागणी?
मुंबई : उद्धव ठाकरे आज रत्नागिरीतील बारसूच्या दौऱ्यावर आहेत. मात्र या दौऱ्यापूर्वीच विरोधकांची टीका उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर होताना दिसतेय. बारसूत उद्धव ठाकरे यांना येऊ देणार नाही, असा इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिला होता. नारायण राणे यांनी दिलेल्या इशाऱ्याची ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी खिल्ली उडवली आहे. येऊ देणार नाही म्हणजे काय? तुमच्या या पोकळ धमक्या बंद करा, असे म्हणत राऊत यांनी थेट इशारा दिला आणि म्हणाले, उद्धव ठाकरे यांना रोखून तर दाखवाच, असं आव्हानही संजय राऊत यांनी दिलं आहे. उद्धव ठाकरे हे बारसू येथे दौऱ्यावर येणार नव्हते त्यांनी महाड येथे सभा होती पण बारसूमध्ये सुरू असलेल्या अत्याचारामुळे ते बारसूला आले आहेत. लोकांशी चर्चा करणार आहेत. येऊ देणार नाही म्हणजे काय? अशा प्रकारच्या धमक्या देणाऱ्यांना गृहमंत्र्यांनी अटक केली पाहिजे. ठाकरे कुटुंब आणि कोकणचं नातं आहे. शिवसेना आणि कोकणचं नातं आहे. जेव्हा जेव्हा कोकणावर आघात झाला. तेव्हा शिवसेना धावून गेली. शिवसेना भांडवलदारांची दलाल नाही. पुन्हा रिपीट करतो. शिवसेना भांडवलदारांची दलाल नाही, असं संजय राऊत म्हणाले.