मुंब्र्यात ठाकरे-शिंदे आमनेसामने! कार्यकर्त्यांची तुफान गर्दी
mumbra shivsena thackeray gatt

मुंब्र्यात ठाकरे-शिंदे आमनेसामने! कार्यकर्त्यांची तुफान गर्दी

| Updated on: Nov 11, 2023 | 5:12 PM

पोलिसांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या ठिकाणी भेट देण्यास मज्जाव करण्यासाठी नोटीस पण बजावली होती. त्यांना मुंब्र्यात जाण्यापासून रोखण्यासाठी ही कलम 144 अन्वये नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर अजून वातावरण तापले. वाद जास्त चिघळू नये यासाठी आता पोलीस प्रशासनाने ही नोटीस रद्द केली. दरम्यान उद्धव ठाकरे मुब्र्यात येणार म्हणून मुब्र्यात पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे. शिंदेंच्या बालेकिल्ल्यावर उद्धव ठाकरेंचं शक्तिप्रदर्शन होणार आहे.

मुंबई, 11 नोव्हेंबर 2023 | उद्धव ठाकरे यांना मुंब्र्यात येऊच देणार नाही, असं पोलिसांनी म्हटल्याचा दावा राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला. मुब्र्यातील घटनेवरून जितेंद्र आव्हाडांनी पोलिसांवर निशाणा साधलाय. TV९ मराठीशी बोलताना जितेंद्र आव्हाडांनी मुंब्र्याच्या पीआय ला फोन लावला आणि ते फोन उचलत नसल्याचं दाखवलं. पोलिसांची काही ऐकण्याची सुद्धा मानसिकता नसल्याचं म्हणत जितेंद्र आव्हाडांनी पोलिसांवर निशाणा साधला. पोलिसांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या ठिकाणी भेट देण्यास मज्जाव करण्यासाठी नोटीस पण बजावली होती. त्यांना मुंब्र्यात जाण्यापासून रोखण्यासाठी ही कलम 144 अन्वये नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर अजून वातावरण तापले. वाद जास्त चिघळू नये यासाठी आता पोलीस प्रशासनाने ही नोटीस रद्द केली. दरम्यान उद्धव ठाकरे मुब्र्यात येणार म्हणून मुब्र्यात पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे. शिंदेंच्या बालेकिल्ल्यावर उद्धव ठाकरेंचं शक्तिप्रदर्शन होणार आहे. मुंब्र्याच्या शाखेबाहेर दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केलीये. दोन्ही गटाकडून जोरदार घोषणाबाजी, बॅनरबाजी केली जातीये. ठाण्याच्या वेशीवर उद्धव ठाकरेंचं जंगी स्वागत करण्यात आलंय.

Published on: Nov 11, 2023 05:12 PM
अबब! झेंडू, पिवळा झेंडू, शेवंती…मागच्या वर्षीच्या तुलनेत एका क्रेटची किंमत तर पहा
एकनाथ शिंदे यांनी ठाण्याचा विकास कसा केलाय ते उद्धव ठाकरेंनी पाहावं- नरेश म्हस्के