संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना डिवचलं अन् म्हणाले, मुख्यमंत्र्यांची अशी बेअब्रू होऊ नये…
शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वरळीतील सभेवर केली टीका
नवी दिल्ली : शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कालच्या वरळीतील सभेवर टीका केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कालच्या सभेला कमी गर्दी झाली होती. अनेक लोक सभेतून निघून जाताना दिसले. त्यामुळे शिंदे गटात चिंतेचं वातावरण असतानाच या सभेवरून संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डिवचल्याचे दिसून आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कालच्या सभेचा पचका झाला. मुख्यमंत्र्यांची परत अशी बेअब्रू होऊ नये, अशी खोचक टीका संजय राऊत यांनी केली आहे. नवी दिल्लीत असताना संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.
Published on: Feb 08, 2023 11:06 AM