मनसे नेते अविनाश जाधव यांच्या जीवाला धोका! सोशल मीडियावर ऑडिओ क्लिप व्हायरल

| Updated on: Mar 25, 2023 | 10:06 PM

VIDEO | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे आणि पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना जीवे मारण्याची धमकी

ठाणे : मनसेचे ठाणे आणि पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत असून ऑडिओ क्लिपमध्ये अविनाश जाधव यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणी मनसे ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांनी ठाण्याच्या नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. अविनाश जाधव यांनी मुंब्रा येथील डोंगरावर अनधिकृत दर्ग्यांवर चौकशी करून हटवण्याची मागणी केली होती. त्यानंतर सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये ‘हम उसे जिंदा नही छोडेंगे, ये बच नही पाएंगे’, असा उल्लेख करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.

Published on: Mar 25, 2023 10:06 PM
‘म्हणून आम्ही पून्हा आयोध्याला जातोय’, शिवसेनेच्या नेत्यानं कारण देत स्पष्टच सांगितलं
पुण्यात पुरुष मंडळींचं अनोखं आंदोलन, एलॉन मस्क यांची पूजा करत केली ‘ही’ मागणी